संकेतस्थळ उद्घाटन

माननीय

श्री. मुरलीधर मोहोळ

सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री

भारत सरकार

यांच्या हस्ते

सौ. तेजश्रीताई महेश पवळे

नगरसेविका । क्रीडा समिती सदस्या

पुणे महानगरपालिका

यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

सौ. तेजश्रीताई महेश पवळे

नगरसेविका । क्रीडा समिती सदस्या पुणे महानगरपालिका

अध्यक्षा - जिजाऊ महिला बचत गट
महिला अध्यक्षा - राजे शिवराय प्रतिष्ठान
शिक्षिका व समाजसेविका

नगरसेविका । क्रीडा समिती सदस्या, पुणे महानगरपालिका
महिला सक्षमीकरणाच्या पुरस्कर्त्या आणि २० वर्षांच्या जनसेवेचा समृद्ध अनुभव असलेल्या़, आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.

सौ. तेजश्रीताई महेश पवळे
BJP Logo

स्क्रोल करा

सौ. तेजश्रीताई महेश पवळे
सौ. तेजश्रीताई महेश पवळे

परिचय

सौ. तेजश्रीताई महेश पवळे

भारतीय जनता पार्टी

नगरसेविका । क्रीडा समिती सदस्या पुणे महानगरपालिका

माझा परिचय

मी एक शिक्षिका, समाजसेविका आणि महिला सक्षमीकरणाची पुरस्कर्ता आहे. माझे पति श्री. महेश शांताराम पवळे यांच्या २० वर्षांच्या जनसेवा कार्याचा प्रवास पाहून आणि त्यात सक्रिय सहभागी राहून, आता स्वतः प्रभागाच्या विकासासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या आदर्शावर चालत, महिलांचे सबलीकरण आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हे माझे ध्येय आहे.

शिक्षण आणि अनुभव

शिक्षिका म्हणून मी शिक्षणाचे महत्त्व आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी समजते. गेल्या अनेक वर्षांपासून बचत गट, लाडकी बहीण योजना, सांस्कृतिक व महिला सक्षमीकरण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे.

माझी जबाबदारी

  • अध्यक्षा - जिजाऊ महिला बचत गट
  • महिला अध्यक्षा - राजे शिवराय प्रतिष्ठान
  • भारतीय जनता पार्टी - सक्रिय कार्यकर्ता
  • महिला सक्षमीकरण आणि समाज सेवा

प्रेरणास्थान

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकमाता रमाबाई आंबेडकर अशा महान व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवा आणि महिला उत्थानासाठी कार्यरत आहे.

पारिवारिक साथ

माझे पती श्री. महेश शांताराम पवळे यांनी राजे शिवराय प्रतिष्ठानाची स्थापना करून २० वर्षांपासून जनसेवा केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने आता मी नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासाला गती देण्यासाठी तयार आहे.

आमचा संकल्प

आमचे ध्येय

वारजे कर्वेनगर प्रभागाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांचा विकास करणे.

आमची जबाबदारी

प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि समर्पणाने जनसेवा करणे. प्रत्येक नागरिकाचे प्रश्न ऐकून त्यांना शासनदरबारी न्याय मिळवून देणे. मदत नव्हे कर्तव्य - ही आमची भूमिका!

प्रमुख कार्यक्षेत्रे

प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आमची प्राथमिकता

रस्ते आणि वाहतूक

वाहतूक कोंडी निवारण, रस्त्यांची दुरुस्ती आणि विकास

पाणी पुरवठा

नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित करणे

आरोग्य सेवा

उत्तम आरोग्य सुविधा आणि जागरूकता कार्यक्रम

वीज पुरवठा

अखंड विजेचा पुरवठा आणि दिवाबत्त्या

क्रीडा सुविधा

क्रीडांगणे आणि युवकांसाठी सुविधा

संस्कृती

सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरा जोपासणे

माझे कार्य

गेल्या २० वर्षांतील प्रमुख उपक्रम आणि सामाजिक कार्य

राजे शिवराय प्रतिष्ठान स्थापना २००५

राजे शिवराय प्रतिष्ठान

स्थापना: २००५

कर्वेनगरमध्ये स्थापना करून शिवजयंती, शिवप्रतापदिन, राजमाता जिजाऊ जयंती, दुर्गामाता दौड, विजयादशमी शस्त्रपूजन, किल्लेस्पर्धा असे अनेक उपक्रम राबवले. आज हे कार्य वारजे, कर्वेनगर, कर्वे रोड, कोथरूड, बाणेर, पाषाण, सुस तसेच पनवेलपर्यंत विस्तारले आहे.

पुणे आणि पनवेल
सिंहगड किल्ला सतत सुरू

सिंहगड किल्ला संवर्धन

किल्ले सिंहगड - आमचा मानबिंदू

सिंहगडावरील मांसाहार, दारू, गुटखा, प्लॅस्टिकबंदी यांसारखी यशस्वी आंदोलने. नैसर्गिक पायवाट संरक्षण, गाड्यांना प्रवेश बंदी, स्वच्छता मोहीम, तानाजी मालुसरे पुण्यतिथी उपक्रम.

पर्यावरण संरक्षण
कोरोना सेवा २०२०-२१

कोरोना काळातील सेवा

मदत नव्हे कर्तव्य

हॉस्पिटलमध्ये दाखल प्रक्रिया, गरीबांना बिलसवलत, मोफत रेमेडीसिव्हर, लसीकरण, अन्नधान्य किट अनेक माध्यमातून लोकसेवा. पूर परिस्थिती व तातडीच्या वैद्यकीय उपचारात प्रत्यक्ष मैदानात उतरून सेवा.

हजारो नागरिकांना मदत
BJP कार्य २०१२ पासून

भारतीय जनता पार्टी

सक्रिय सहभाग: २०१२ पासून

बुथ प्रमुख, युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष, पुणे शहर चिटणीस यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळत प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम.

जनसेवा
व्यापारी संघटना २ वर्षे

कर्वेनगर व्यापारी संघटना

अध्यक्ष: २ वर्षे

व्यापारी वर्गांचे नेतृत्व करत अनेक प्रश्नांना वाचा फोडली. व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण आणि व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न.

व्यापारी हित
सांस्कृतिक कार्यक्रम नियमित

सांस्कृतिक उपक्रम

हिंदुत्व आणि संस्कृती

शिववंदना, शंभूवंदना, किल्लेस्पर्धा, दुर्गामाता दौड, विजयादशमी शस्त्रपूजन असे सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले

हजारो सहभागी

पारिवारिक साथ आणि अनुभव

२० वर्षांच्या जनसेवा अनुभवाचा पाया

श्री. महेश शांताराम पवळे

संस्थापक - राजे शिवराय प्रतिष्ठान

२० वर्षांचा जनसेवा प्रवास: राजे शिवराय प्रतिष्ठानाच्या स्थापनेपासून आजपर्यंत, श्री.महेश पवळे यांनी वारजे कर्वेनगर परिसरात अथक परिश्रम घेऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

राजे शिवराय प्रतिष्ठान

२००५ पासून शिव कार्य आणि सांस्कृतिक उपक्रम

समाजसेवा

हजारो कुटुंबांना मदत आणि मार्गदर्शन

जनसेवा अनुभव

२० वर्षांचा प्रभागातील कार्याचा अनुभव

महेश शांताराम पवळे
२० वर्षे जनसेवा